मुकेश अंबानींच्या कंपनीची 4G सेवा लवकरच
मुकेश अंबानी
रिलायन्स इन्फोकॉम या नावाने रिलायन्सने टेलिफोन सेवा लाँच केल्यानंतर मुकेश अंबानी यांची दूरसंचार क्षेत्रात येण्याची ही दुसरी वेळ आहे. मुकेश अंबानी यांनी सुरू केलेली रिलायन्स इन्फोकॉम आता अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कम्युनिकेशन म्हणून ओळखली जाते.
भारतात ज्या भागात रिलायन्सला 4G सेवा पुरवण्यात स्वारस्य नसेल तिथे भारती एअरटेल 4G सेवा पुरवणार आहे. रिलायन्स आणि भारती एअरटेल यांच्यात एकमेकांच्या पायाभूत सुविधा वापरण्याचा सामंजस्य करार झाल्यानंतर टेलिकॉम डिपार्टमेंटने लगेच रिलायन्सला आपली सेवा सुरू करण्यासाठी तब्बल दोन कोटी 22 फोन नंबर जारी केले आहेत.
भारती एअरटेल आणि रिलायन्स यांच्यातील करारानुसार रिलायन्स भविष्यात भारती एअरटेलच्या सौजन्याने आपल्या ग्राहकांना 2G आणि 3G सेवाही पुरवू शकणार आहे. भारती एअरटेलकडे सध्या आठ मोबाईल सर्कलमध्ये 4G सेवा पुरवण्याचा परवाना आहे, त्यापैकी सहा शहरात एअरटेलने 4G सेवा लाँच केलीय.
रिलायन्सच्या फोन सेवेला अजून सुरूवात झालेली नाही.
रिलायन्स जिओला यापूर्वीच टेस्टिंगसाठी काही टेलिफोन नंबर जारी करण्यात आले होते. ऑक्टोबरमध्ये रिलायन्सकडून 4G सेवेच्या चाचणीकरिता टेलिकॉम डिपार्टमेंटकडे नंबर्सची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर त्याची लगेच पूर्तता करण्यात आली. रिलायन्सने गुजरातमधील जामनगर, महाराष्ट्रात मुंबई आणि राजधानी दिल्ली या सर्कलमध्ये आपल्या 4G मोबाईल सेवेची चाचणी केलीय.
source:http://abpmajha.newsbullet.in/technology/
0 comments:
Post a Comment