आज दि.१०.०९.२०२० रोजी पंढरपूर डाक विभागातील “आगलावेवाडी” ता: सांगोला या गावामध्ये भारतीय डाक विभागाच्या वतीने “Five Star Village- पंचतारांकित ग्राम” योजनेचा प्रारंभ मा. श्री. संजयजी धोत्रे, केंद्रीय दूरसंचार आणि दळणवळण राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते Online (विडीओ कॉन्फरन्स) पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी “आगलावेवाडी” येथील सरपंच, प्रशासक, ग्रामसेवक आणि भारतीय डाक विभाग पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक श्री.एन. रमेश, सहायक अधिक्षक श्री. आर. बी.घायाळ आणि डाक निरीक्षक मंगळवेढा श्री. एस. आर. गायकवाड आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल distancing व सामाजिक सुरक्षेचे सर्व निकष पाळत पार पडला.
सदर योजने साठी पंढरपूर डाक विभागातील प्रायोगिक तत्वावर “आगलावेवाडी” ता: सांगोला या गावाची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय डाक विभागाच्या विविध पाच प्रकारच्या योजना या गावातील प्रत्येक घराघरात पोहोचविण्याचा आणि त्याद्वारे भारत सरकारच्या आर्थिक समावेशकतेच्या धोरणामध्ये ग्रामीण जनतेस समाविष्ट करून घेणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये बचत बँकेच्या विविध योजना, मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे खाते, टपाल जीवन बिमा आणि ग्रामीण टपाल जीवन बिमा तसेच प्रधानमंत्री सुरक्षा आणि जीवन ज्योती बिमा योजना या योजना राबविण्यात येतील.
या योजनेचा शुभारंभ online पद्धतीने विडीओ कॉन्फरन्स द्वारे मा. श्री. संजयजी धोत्रे, केंद्रीय दूरसंचार आणि दळणवळण राज्यमंत्री, भारतीय सरकार, श्री. प्रदीप्त कुमार बिसोई, भारतीय डाक विभागाचे सचिव आणि श्री. विनीत पांडे, डायरेक्टर जनरल भारतीय डाक विभाग नवी दिल्ली आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे करण्यात आला.
अधिक्षक डाकघर, पंढरपूर डाक विभाग यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, सर्वांनी या “Five Star Village- पंचतारांकित ग्राम” या भारतीय डाक योजनेमध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त लोकांनी पोस्टाच्या योजनेचा लाभ घ्यावा..